BIG BREAKING! राजूर घाट बलात्कार प्रकरणाला वेगळेच वळण; तो म्हणतो तिच्यावर बलात्कार झाला ; ती म्हणाली बलात्कार झालाच नाही,माझी वैद्यकीय तपासणी करू नका..महिला काय म्हणाली वाचा बातमीत...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटात ३४ वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा काल रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी ३ तास बोराखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून गुन्हा दाखल करून घेतला होता. हे वृत्त पसरतात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणात आता वेगळीच आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाही, आरोपींनी  आमच्याकडील पैसे, मोबाईल नेले, आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व आरोपी तिथून निघून गेले असे ३४ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले. लैंगिक अत्याचार झालेलाच नाही त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही असेही महिलेने पोलिसांना लिहून दिले आहे.

add 

                              ( जाहिरात )

सदर घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले होते. पोलिसांनी तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती.  पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. मात्र विवाहितेच्या आणि तिच्यासोबत असलेल्या  पुरुषाच्या बयानांत वेगवेगळी माहिती समोर आली आहे.
 
  तो म्हणतो बलात्कार झाला, ती म्हणते नाही झाला..

    बुलडाणा तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिला तिच्या पुरुष नातेवाईकासोबत राजुर घाटात फिरायला गेली होती. बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या घाटातील देवीच्या मंदिराजवळील दरीत महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या गळ्याला चाकू लावून खिशातील ४५ हजार रुपये काढले असे पीडित पुरुषाने तक्रारीत व त्यानंतर पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले. मात्र पीडित(?) महिलेने वेगळे बयान दिले ते पोलिसांनी नोंदवले आहे.

ghj
महिला काय म्हणाली..?

"देवीच्या मंदिराजवळ आम्ही काल दुपारी २ वाजता पोहचलो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर बोलत बसलो. त्यावेळी तिथे ८ जण आले, त्यांनी आम्हाला घेरले. सोबतच्या पुरुषाला मारहाण केली. त्या ८ जणांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. पुरुषाच्या खिशातून त्यांनी ४५ हजार रुपये काढून घेतले. मलाही पैसे मागितले, मी नकार दिल्याने "त्याच्यापासून" १५ ते २० मीटर अंतरावर बाजूला नेवून फोन व पैशाची मागणी केली. न दिल्यास सोबतच्या पुरुषाला जीवाने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर माझ्याकडील Narzo कंपनीचा मोबाईल व सोबत असलेले १०० रुपये घेतले. आम्हा दोघांना एका ठिकाणी बसवून आमचे फोटो काढले, घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास तुमची समाजात बदनामी करू अशी धमकी दिली आणि सर्व आरोपी निघून गेले.." असे महिलेने पोलिसांना दिलेल्या बयानात म्हटले आहे. पिडीत महिलेने जबाबात असेही म्हटले की,१९ ते २५ वयोगटातील इसमानी पकडून त्यांच्याकडून पैसे ,मोबाईल घेऊन हातावर ,पाठीवर चापटा बुक्यांनी मारहाण केली, जिवाने ठार मारण्याची धमकी दिली.  आरोपींनी कोणताही लैंगिक अत्याचार केलेला नाही, त्यामुळे वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही असे महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष लिहून दिले आहे. ८ पैकी ४ आरोपी ताब्यात...दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या "लुटमार" प्रकरणातील ४ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.