BIG BREAKING! मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचे नारे आणि पाकिस्तानी राष्ट्रध्वज झळकला!

 
gyfj
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सायबर क्राईम चे लोण आता जिल्ह्यात पसरत चालले आहे. आज मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजची वेबसाईट हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
 

संगणावर वेबसाईट उघडल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादचे नारे व पाकिस्तानी राष्ट्रध्वज झळकत होता. बुलडाणा  सायबर पोलिसांनी ही माहिती मेहकर पोलिसांना व मेहकर पोलिसांनी कॉलेज प्रशासनाला दिली. फारसा वापर नसणारी ही वेबसाईट असल्याने ही बाब लवकर उघडकीस आली नव्हती, मात्र सायबर पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. सध्या कॉलेज प्रशासनाकडून वेबसाईट बंद करण्यात आली असून कॉलेजचे प्राचार्य गणेश परीहार तक्रार देण्यासाठी मेहकर पोलिसांत पोहचले आहेत.