BIG BREKING! चिखलीत पेटवापेटवी;भाजप नेत्याची स्कॉर्पिओ जाळली! आरोपी नयन विलासआप्पा बोंद्रे सीसीटीव्हीत रंगेहाथ पकडला..

 
Vbjuy
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या चिखलीत आज एक वेगळीच घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून जाळण्यात  आली आहे. उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना  घडली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी नयन विलासआप्पा बोंद्रे याला ताब्यात घेतले आहे.

 स्वप्नील उर्फ आप्पुसेठ गुप्ता यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्यात आली. चिखली शहरातील जयस्तंभ चौकात  स्वप्नील गुप्ता यांचे घर आहे. स्वप्नील गुप्ता हे भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. "सही दिशा स्पष्ट निती, भाजपा" असे लिहिलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांनी घराच्या मागील बाजूस उभी केली होती. रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या स्वप्नील गुप्ता यांना काहीतरी फुटल्याचा आवाज आला.त्यांनी  मागे जाऊन बघितले असता गाडी जळत असलेली दिसली. त्यांनी तातडीने तिथल्या अन्य गड्यायापासून जळत्या गाडीला दूर केले. यावेळी आगीच्या पूर्ण लोटांनी बाजूच्या घराच्याही भिंती काळवंडल्या आहेत. आगीत गाडीचा पूर्ण कोळसा झाला आहे.

   दरम्यान घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाला आहे. विशेष म्हणजे आरोपी प्रतिष्ठित घराण्यातील आहे. आरोपी नयन विलासआप्पा बोंद्रे यांचे मोठ्या सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्याचे घरही स्वप्नील गुप्ता यांच्या घराच्या बाजूला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.