शेगावात मोठा अपघात! हजार किलोमीटरचा प्रवास सुखरूप केला; पण घर २ किलोमिटर अंतरावर असताना घात झाला ; भाविकांची क्रुझर पिलरला धडकली; तिघा भाविकांचा जागीच मृत्यू; ७ गंभीर
May 22, 2023, 12:27 IST
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हावासियांसाठी आजचा दिवस खराब बातमी घेऊन उजाडला. शेगावात झालेल्या एका मोठ्या अपघातात ३ भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ७ भाविक गंभीर जखमी आहेत. आज,२२ मेच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
पंढरपूरावरून पांडुरंगाच्या दर्शनाून परत येणाऱ्या भाविकांच्या क्रुझरला हा अपघात झाला. शेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या पिलरला भाविकांची क्रुझर धडकल्याने ३ भाविकांच्या मृत्यू झाला. ७ भाविक यात जखमी असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालकाला झोप लागल्याने झोपेच्या धुंदीत हा अपघात झाल्याचे बोलल्या जात आहेत.जखमींवर शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काहींना अकोल्याला हलविण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. भाविकांचे घर अवघ्या २ किलोमिटर अंतरावर असताना हा अपघात झाला. त्याआधीच जवळपास १००० किलोमीटरचा सुखरूप प्रवास झाला. घर काही मिनिटांच्या अंतरावर असताना झालेल्या या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.