"प्रेम पाटील" बनून महिलेशी मैत्री केली! तिच्या शरीराचा वारंवार उपभोग घेतला! तब्बल ३ वर्षानंतर कळले हा प्रेम पाटील नाही, हा तर सय्यद शरीफ...

 
crime

अकोट( लाइव्ह ग्रुप नेटवर्क):प्रेम पाटील नावाच्या एका तरुणाची अकोट येथील एका महिलेची फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचारासह त्याने आर्थिक फसवणूक करीत ३ लाख ७० हजार रुपये उकळले. तब्बल तीन वर्षानंतर प्रेम पाटील हा खरा सय्यद शरीफ असल्याचे नंतर कळाले. सय्यदच्या सततच्या त्रासाला कंटाळून या महिलेने सर्व घटनाक्रम भावाला आणि त्यानंतर पतीला सांगून कुटुंबीयांसह तिने आकोट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सय्यदला अटक केली आहे.

 अकोट तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेचे फेसबुकवर अकाउंट होते. तिला तीन वर्षांपूर्वी प्रेम पाटील या नावाने रिक्वेस्ट आली होती. तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर दोघांमध्ये चांगली ओळख झाली. एकमेकांसोबत बोलू लागले. काही दिवसानंतर प्रेमने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघेही व्हॉट्सअप फोन ऑडिओ, व्हिडिओद्वारे बोलू लागले. मैत्री घट्ट झाल्यानंतर प्रेमने तिला तीन हजार रुपये उसने मागितले. अन् तिनेही पैसे दिले. हळूहळू त्यांचे संबंध घरापर्यंत पोहोचले. तिचा पती घरी नसताना प्रेम तिच्या घरी यायचा. त्यानंतर प्रेमने तिचा मोबाईल हातात घेतला. मोबाईलमधून तिच्या पतीसह नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक घेतले. मात्र, नंतर त्याने या संबंधाबाबत तुझ्या पतीला सांगेल अशी धमकी देत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. नाईलाजाने तिला मागणी मान्य करावी लागली.परंतु काही दिवसांनंतर तिला प्रेमचे सत्य कळले. वास्तविकमध्ये प्रेमचे नाव सय्यद शरीफ सय्यद सफी असल्याचे समजले. दरम्यान, प्रेमने  सुरुवातीला आपले नाव आणि धर्म दोन्ही गोष्टी लपविल्या होत्या. तसेच त्याने तो अविवाहित असल्याचे सांगितले.

तुझी बदनामी करेन म्हणत अशाप्रकारे तिला ब्लॅकमेल करीत सय्यदने अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अन् त्याचे व्हिडीओदेखील मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशा धमक्या देऊ लागला. इतकेच नव्हे तर तिच्यावर लक्ष ठेवता यावे या उद्देशाने तिच्याच घरामागे एका खोलीमध्ये कुंटुबासह भाड्याने राहायला आला. महिलेचा पती घरी नसल्याबाबतची सर्व माहिती ठेवून घरी येत सतत अत्याचार केला. बदनामी आणि मुलांना मारण्याची धमकी देत तब्बल ३ लाख ७० हजार रुपये उकळले. १५ मे रोजी तिच्या मुलाची अकोल्यात परीक्षा असल्याने पती अन् मुलगा दोघेही घरून निघाले. पुन्हा सय्यदने तिच्यावर अत्याचार केला. पती घरी आल्यानंतर ती माहेरी मुलांसह निघून गेली. माहेरी असताना सय्यद शरीफ सय्यद सफी याने वारंवार फोन करून 'तू लवकर परत ये, तू जर परत आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी दिली. अखेर तिच्या संयमचा बांध सुटला आणि सर्व घडलेला प्रकार भावाला सांगितला. त्यानंतर पतीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले. आकोट शहर पोलिस ठाण्यात सय्यदविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सद्यस्थितीत आरोपी हा कारागृहात असून, याप्रकरणी अधिक तपास अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.