"ती" त्याच्याशी बोलत नव्हती म्हणून...विद्यार्थ्याने वर्गातच केली आत्महत्या! चिठ्ठीत लिहिले......! जळगाव जमोदच्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील धक्कादायक घटना...

 
Ghui
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "ती" माझ्याशी न बोलता वर्गातील इतर मुलांशी बोलते असे मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून वर्गखोलीतच तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद च्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात काल, १ फेब्रुवारीच्या दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. सूरज रामकृष्ण गावंडे(१९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बी. कॉम प्रथम वर्षाला शिकत होता.

वर्ग खोलीत परीक्षेचे रोल नंबर टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना सूरजचा मृतदेह वर्गातील फॅनला लटकलेला दिसला. दुपट्ट्याने त्याने गळफास घेतला होता. यावेळी तात्काळ महाविद्यालय प्रशासनाने सूरजला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान पोलिसांना सुरजच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात एक मुलगी माझ्याशी  न बोलता इतर मुलांशी बोलत होती अशा आशयाची माहिती लिहिलेली आहे. विशेष म्हणजे त्याने एका रजिस्टर मध्ये आणखी तीन मुलांची नावे देखील लिहिलेली असल्याने सूरजने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केली असण्याचा अंदाज आहे.याप्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.