भुंकले कुत्रे अन्‌ वाद पोलीस ठाण्यात गेला माणसांचा!

खामगाव शहरातील घटना
 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुत्रे भुंकल्यावरून शेजाऱ्यांमध्ये मारामारी झाली. कुत्र्याच्‍या मालकाविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना खामगाव शहरातील एरिगेशन कॉलनीत काल, १६ नोव्‍हेंबरला रात्री आठच्या सुमारास घडली.
पंकज अमृता मिसाळकर (३०, रा. एरिगेशन कॉलनी अकोला रोड खामगाव) याने या प्रकरणात तक्रार दिली. नारायण ठाकूर (रा. एरिगेशन कॉलनी खामगाव) असे गुन्‍हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दोघे शेजारी राहतात. पंकज कामावरून घरी जात असताना नारायणने पाळलेले कुत्रे त्‍याच्‍यावर भुंकले. त्‍यामुळे पंकजने नारायणला कुत्रे आतमध्ये बांधत जा, असे सांगितले. त्‍यावरून वाद होऊन नारायणने पंकजला शिविगाळ करून डावे कानावर काठी मारून जखमी केले. तपास सहायक फौजदार दीपक इलामे करत आहेत.