बापा बापा २७ लाखांनी फसवले! रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून बुलडाण्याच्या महादेवाने ६ तरुणांना चुना लावला! वाचा कसा लागला चुना...

प्राप्त माहितीनुसार महादेव साहेबराव चव्हाण (रा. सुंदरखेड, खामगाव रोड, बुलडाणा,ह. मू. सिन्नर, जि.नाशिक ) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तरुणांनी जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा आरोपी महादेवने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्व पर्याय संपल्याने युवकांनी थेट बुलडाणा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार महादेव चव्हाण याची खामगाव रोड सुंदरखेड, बुलडाणा येथे मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेचे कार्यालय २०२० ते २०२२ दरम्यान सुरू होते. संस्थेमध्ये येणे- जाणे असल्याने फसवणूक झालेल्या युवकांची आरोपी महादेव चव्हाण यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी महादेवने केंद्रीय रेल्वे खात्यात लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. प्रत्येकाकडून वेगवेगळी रक्कम मिळून एकूण २७,०५,५०० रुपये ऑनलाईन व नगदी स्वरूपात महादेवने घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सुधाकर चौधरी यांच्या मुलाला नोकरी लावून देतो म्हणून २ लाख ३० हजार रुपये,अक्षय गोरे २ लाख २० हजार, निलेश चौथनकर २ लाख ७० हजार, शेख शरीफ शेख २ लाख ४० हजार, मधुकर चौधरी १५ लाख, आशिष डोक २ लाख ४५ हजार, या रकमेपैकी ८० हजार रुपये ९०२८२३७९६४ या मोबाईलवर फोन पे केले. १ लाख ६५ हजार ही रक्कम नगदी दिली. दरम्यान नोकरीच्या जॉइनिंग लेटर साठी वारंवार विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली.२५ मे रोजी पैशाची मागणी केली असता, मी आत्महत्या करून तुम्हाला खोट्या केस मध्ये गुंतवून टाकणार अशी धमकी आरोपीने दिली आहे. अशी तक्रार सुधाकर चौधरी, अक्षय गोरे, निलेश चौथनकर, शेख नावेद शेख शरीफ, मधुकर चौधरी, आशिष डोक यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.