BREAKING मुरादपूर जवळ सापडली बॅग! बॅग मध्ये अभ्यासाची पुस्तके अन् तरुणीचे कपडे! पुस्तकावर "स्नेहा कोठारी" नाव!

असोला मर्डर प्रकरणातील तरुणीच्या हातावर गोंदलेले होते SK..! पोलीस तपासत आहेत, काही Clues मिळतात का...
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ जानेवारीला चिखली ते देऊळगामही दरम्यान असलेल्या असोला शिवारातील बंद पडलेल्या राजवाडा ढाब्यामागे एका तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्या मृत तरुणीची ओळख पटविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, मात्र या घटनेला ९ दिवस उलटून देखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. राज्यभरात झालेल्या बेपत्ता मुलींच्या पालकांची देखील पोलिसांनी चौकशी केली पण त्यातून काही समोर आले नाही..दरम्यान आता या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे, अर्थात ती याप्रकणाशी मिळतीजुळती आहे का हे तपासानंतरच समोर येईल..चिखली देऊळगावराजा रोडवरील मुरादपूर फाट्याजवळ एक बेवारस बॅग आढळून आली आहे. या बॅग मध्ये अभ्यासाची पुस्तके आणि तरुणीचे कपडे सापडले आहेत. पुस्तकावर स्नेहा कोठारी असे नाव लिहिलेले आहे..
 मुख्य रस्त्यापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर ही बॅग सापडली. मुरादपूर शिवारात असलेल्या खडकपूर्णा च्या कॅनॉल जवळ ही बॅग टेकाळे नामक शेतकऱ्याला मिळून आली. बॅग मध्ये सीए परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक पुस्तके आहेत व पुस्तकावर स्नेहा कोठारी असे नाव लिहिलेले आहे. शिवाय बॅग मध्ये अंदाजे २० ते २२ वर्षाच्या तरुणीचे कपडे मिळून आले आहेत.
   पोलिस शोधत आहे clues...
दरम्यान मुरादपुर शिवारात सापडलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही बॅग कुणाची आहे, स्नेहा कोठारी कोण आहे? ही बॅग इथे कशी आली याचा शोध पोलीस घेत आहेत. असोला मर्डर प्रकरणातील तरुणीच्या हातावर दिलं आणि त्यात Sk गोंदलेले होते, त्यामुळे त्या प्रकरणाशी या बॅग चा काही संबंध आहे का आदी बाबी पोलीस शोधत आहे. पुस्तकावर स्नेहा कोठारी नाव लिहिलेले असले तरी त्यावर मोबाईल नंबर किंवा पत्ता लिहिलेला नाही त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात समोर काय येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे..