विद्यार्थिनीच्या मागं मागं फिरून लाईन मारायचा! आता भोग कर्माची फळं! वाचा खामगावात काय घडल..

 
crime

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  महाविद्यालयातून घराकडे निघालेल्या युवतीला अडवून विनयभंग करणाऱ्या टवाळखोर युवकास खामगाव येथील सत्र न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली. गुन्हा सिद्ध होताच न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.

शहरातील एक विद्यार्थिनी १० मार्च २०१५ रोजी महाविद्यालयातून घरी जात असताना आरोपी विकी दादाराव वानखेडे (२३) याने तिला आवाज देऊन बोलावले. हात धरून विनयभंग केला. युवतीने आरडाओरड करताच नागरिक तिच्या मदतीला धावले. तेवढ्यात आरोपी विकी पळून गेला. यापूर्वीहीआरोपीने विद्यार्थिनीला असाच त्रास दिला होता. वारंवार होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराने संतापून पीडित युवतीने जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच न्यायालयातही न घाबरता घटनाक्रम पुराव्यांद्वारे सांगितला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी आठ साक्षीदारांचे पुरावे न्यायालयासमोर नोंदवले.सरकार पक्षाच्या सर्व साक्षीदारांचा पुरावा तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विकी वानखेडे याला एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपासी अंमलदार जयपाल ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पैरवी म्हणून पोहेकॉ चंद्रलेखा शिंदे यांनी काम पाहिले.