Amazon Ad

बाबो..!पिंप्री ते सुजातपुर नवीन डांबरीकरण झालेला रस्ता बघितला का..?किती हा भष्टाचार..?

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):पिंप्री ते सुजातपुर पर्यन्त नवीन डांबरीकरण रस्ता होत आहे. मात्र या रस्त्याचे काम खूपच निष्कृट दर्जाचे होत, असल्याने गट ग्रामपंचायत सदस्य सुजातपुर येथील मनोज पदमाकर पाटील यांनी तशी तक्रार उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, खामगाव यांना दिली आहे.

त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.पिंप्री ते सुजातपूर गावापर्यंत जो नवीन डांबरीकरण रस्ता टाकण्यात येत आहे. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य व डांबराचा वापर झालेला आहे. डांबराच्या नावाखाली काळे ऑइल व मिलावटच्या सिरॅमिक डांबरचा वापर करण्यात आला आहे.

सिलकोट टाकण्यात आला मात्र त्याच्याखाली कोणत्याही प्रकारच्या गिट्ठीचा वापर न करता त्यामध्ये फक्त मुरूम वापरण्यात आला आहे. त्यामुळे रोड चक्क हाताने उकडून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार याच्यावर योग्य ती कारवाई करून हा रोड व्यवस्थित करावा असेही मनोज पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.