८५ व्या वर्षी टोकाचा निर्णय घेतला! कारण काय ? नांदुरा तालुक्यातील घटना

 
Bdnxnxn
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोमिनाबाद येथील एका ८५ वर्षीय वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
मोमिनाबाद येथील रहिवासी असलेले शिवराम कार्यासिंग वानखडे (वय ८५ वर्षे) यांनी काल, २९ ऑक्टोबरच्या सकाळी साडेचार वाजता पूर्वी घडली स्वतःच्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह खाली काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
    या प्रकरणी त्यांचा मुलगा उमेश शिवराम वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. एवढ्या उतारवयात त्यांना का टोकाचा निर्णय घ्यावा लागला असेल याबाबत पोलीस तपास करीत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार खोंदिल हे करीत आहेत.