भरधाव काळीपिवळी उलटली १४ प्रवासी गंभीर! चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; चालक पळून गेला! मेहकर तालुक्यातील घटना
Jul 29, 2024, 10:11 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगातील काळीपिवळी टॅक्सी उलटून रस्त्याच्या कडेला खड्यात कोसळली. या अपघातात १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. लोणार ते मेहकर मार्गावर चिंचोली फाट्याजवळ २८ जुलैच्या दुपारी १२ वाजता ही घटना घडली
लोणार येथून एमएच-२७-बी- ६२३४ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीमधून प्रवासी मेहकरसाठी प्रवास करीत होते. चिंचोली फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी उलटून रस्त्याच्या कडेने खड्ड्यात कोसळली. टॅक्सी कोसळताच प्रवाशांनी एकच आक्रोश केला. समोरून कुठलेच वाहन आले नसताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी ओमप्रकाश राईतकर यांनी सांगितले. वाटसरूंनी मदत करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच नीरज रायमूलकर यांच्यासह सागर कडभने, रवी जुनघरे, वरद ठाकूर, सचिन मापारी, तेजस अवस्थी यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. काही जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात, तर काहींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बाहेर काढताच पळाला चालक
वाहन उलटल्याने प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले होते. तसेच चालकसुद्धा दबला होता. त्याला जखमी अवस्थेत नागरिकांनी बाहेर काढले. परंतु घटनास्थळी न थांबता चालकाने भीतीपोटी धूम ठोकली.
जखमींची नावे
तमन्ना भारत शिंदे (८), स्वाती भारत शिंदे (३०), खुशी भारत शिंदे (१३) सर्व रा. मालेगाव, जि. वाशीम, दीपाली तुकाराम गायकवाड (२२, मालेगाव), कामक विष्णू कडे (६१, सुलतानपूर), संगीता प्रसाद शेवाळे (७०, रा. वेणी), दीपाली किसन बाजार (२४, लोणार), रईसाबी शेख रईसोद्दीन (५४), आसमा शेख अमीन (६०, लेहणी), निर्मला तुकाराम गायकवाड (५२, मालेगाव), रोहीत शिवरकर (२३, चिखली), साक्षी रोहीत शिवरकर (१९, चिखली