बायकोला मुलगी झाली म्हणून त्याने तिच्यासोबत नको ते केलं..! मेहकरच्या दीक्षित कुटुंबाविरुद्ध गुन्हे दाखल

 
Fhf
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मेहकरच्या दीक्षित कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. दीक्षित घराण्याच्या सूनेनेच पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली.मुलगी झाली म्हणून आपला अतोनात छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२६ वर्षीय नूतन मयूर दीक्षित या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार २०२० ऑगस्ट महिन्यात मेहकरच्या मयूर दीक्षित याच्याशी तिचे लग्न झाले होते. १५ जून २०२१ ला तिला मुलगी झाली तिचे नाव राव्या असे ठेवले. मुलगी झाल्याने तिच्या नवऱ्यासह सासू, सासरे, नणंद तिचा अतोनात छळ करू लागले. आम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगी नको होतो आम्ही तुला वागवत नाही असे टोमणे सासरचे लोक मारत होते असे तक्रारीत म्हटले आहे. तिल्या मारझोड करण्यात होती, तू भिकाऱ्याची पोर आहे, तुला नीट कामधंदा येत नाही आमच्या मुलाचे आता दुसरे लग्न लावून देतो असे सासरचे म्हणत होते. तुझ्या आईच्या नावावर असलेली ११ गुंठे शेती विकायला सांग आणि चारचाकी घ्यायला ४ लाख आण तरच तुला वागवतो नाहीतर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले तर कुणाला काही कळणार नाही असे तिला सांगण्यात आले व तिला हाकलून देण्यात आले असे विवाहिते तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून विवाहितेचा नवरा मयूर दीक्षित, सासू शोभाबाई दीक्षित, सासरा गोविंद दीक्षित आणि नणंद रोहिणी पाठक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.