शिवराज्याभिषेकाबाबत व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह काँमेंट करणाऱ्या अमडापुरच्या अन्वर काझीला अटक! औरंगजेबाचा आला होता पुळका

 
police static

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही काळापासून धार्मिक तणाव उत्पन्न करणाऱ्या घटना राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतांना चिखली शहरात देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस व्हॉट्सअपला ठेवल्याबद्दल अमडापूर येथील अन्वर काझी या भामट्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेमध्ये टिप्पणी करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. तशी तक्रार रोहित विलास घोलप या युवकाने चिखली पोलीस ठाण्यात ७ जून रोजी दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, २ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र साजरा झाला, त्याबद्दल रोहित घोलप याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याबाबत स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून अमडापूर येथील अन्वर काझी या यवकाने रोहितच्या Whatsapp स्टेटसला QRe baal tere baap ko bhul gaya kya असा मॅसेज व 'अरे शिवाजी महाराज बाद में आये रे बेटा औरंगजेब पहीले तुम्हारे बाप है ना' अशा स्वरुपाची आक्षेपार्ह ऑडीओ क्लीप त्याच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवली. हे दोन्ही रिप्लाय आल्यानंतर रोहीतने या घटनेची माहिती त्याच्या वडीलांना दिली. रोहित घोलप यांचे वडील विलास घोलप हे त्यादिवशी टायफाईडच्या आजारामुळे दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेले असल्या कारणाने पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी चार दिवस विलंब झाला. ७ जून रोजी या संदर्भात रितसर तक्रार रोहित विलास घोलप यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात अन्वरवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.  सदर घटनेतील आरोपी अन्वर काझी आणि फिर्यादी रोहित घोलप हे दोघेही वर्गमित्र आहेत. दोघेही अनुराधा फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याने दोघांचेही मोबाईल नंबर परस्परांजवळ आहेत. त्यामुळे ते दोघे येथे परस्परांचे व्हाट्सअप स्टेटस नियमित पाहत असतात आणि याच संबंधांमधून हा प्रकार घडला.