शेगावात पुन्हा एक मर्डर! बायकोचे दुसऱ्यावर प्रेम, नवऱ्याला राग आला अन् झोपेत गळा आवळला..

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या आठवड्यात शेगाव तालुक्यातील नागझरी येथे झालेल्या १४ वर्षीय क्रिष्णा हत्याकांडाने शेगाव तालुका हादरलेला असताना शेगावात आणखी एक खून झाला आहे. नवऱ्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. बायकोचे दुसऱ्यावर प्रेम होते, त्यामुळे ती नवऱ्याला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचा राग डोक्यात शिरल्याने नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केल्याचे समोर येत आहे.
 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑगस्ट रोजी शेगाव शहरातील अग्रसेन चौकातील देविदास कासार यांच्या भांड्याच्या दुकानासमोरील ओट्यावर एका ५० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता.प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज मधून महिलेचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना दिसले.
  शव विच्छेदन अहवालात देखील महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता नवऱ्याने बायकोचा खून केल्याचे समोर आले. मृतक महिला ही बाळापूर ची आहे. काही महिन्यांपासून ती पतीला सोडून प्रियकरासोबत राहत होती, त्याचा राग मनात भिनल्याने महिलेचा पती गौतम गाडेकर याने पत्नीचा खून केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .