संतापजनक ! जळगाव जामोदच्या डॉ. वानखडेने महिलेसोबत केले दुष्कृत्य ! हात पकडला अन्.. नको ते केले..! कारण काय तर...

 
 Vvv
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जळगाव जामोद येथून अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी बातमी समोर येते आहे. एका ४० वर्षीय महिलेसोबत डॉक्टरने दुष्कृत्य केल्याची घटना काल ६ जुलैच्या सकाळी घडली. 
  प्राप्त माहितीनुसार, पिडीत महिलेने, शनिवारी सायंकाळी
 ५ वाजेच्या सुमारास पोलिसात तक्रार दिली, पिडीत महिलेचे जळगाव जामोद शहरात दुकान असून त्याठिकाणी चहा मिळतो. शनिवारी पहाटे ३ वाजता चहाची तलप लागली म्हणून वानखडे हॉस्पिटल मधील डॉ. गोविंद वानखडे, प्रतीक देशमुख, आणि एक अनोळखी इसम पिडीत महिलेच्या घरी गेले. त्यांनी महिलेला चहा व सिगारेट मागितली. आता दुकान बंद झाले आहे, तुम्ही सकाळी या असे महिलेने त्यांना सांगितले. परंतु, त्या तिघांनी महिलेला शिवीगाळ केली
    त्यानंतर, सकाळी ७ वाजता वानखडे हॉस्पिटल मधील ते तिघे महिलेच्या दुकानासमोर आले. पहाटे तीन वाजता चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून परत महिलेला शिवीगाळ केली. धमकी दिली व तेथून ते निघून गेले. त्यांनतर परत दुपारी २:३० वाजता तिघेही पिडीत महिलेच्या दुकानात आले. दुकानातील सामानाची फेकफाक त्यांनी केली. त्यावेळी सामान फेकू नका ! असे पिडीतेने म्हटले असता डॉ. गोविंद वानखडे यांनी महिलेचा हात पकडून साडी ओढली असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. गोविंद वानखडे, प्रतीक देशमुख व एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार रामदास घट्टे करीत आहेत. दरम्यान, बुलडाणा लाइव्हने त्यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी, घटनास्थळी पोहोचत असून पंचनामा करणार असल्याचे तपास अधिकारी रामदास घट्टे यांनी सांगितले.