मालवाहू चालकाला कामावरून काढल्याचा राग , मालकाच्या नाकावरच मारली लाथ! धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा!

 
धामणगाव
धामणगाव बढे(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्ही गवळी गावात एका मालवाहू गाडीच्या मालकाने कामावर ठेवलेल्या चालकाला कायमची सुट्टी दिली. मनात या गोष्टीचाच राग धरून चालकाने आपल्या जुन्या मालकाच्या नाकावरच लाथ मारली. यात मालवाहू गाडीचे मालक जखमी झाले. त्यांनतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मालवाहू चालक भूषण शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Add
                        Add. 👆
 यासंदर्भात मालवाहू गाडीचे मालक नंदकिशोर मुंदोकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रविवार, १० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुंदोकार हे गावातून जात असताना भूषण श्रीकृष्ण शिंदे हा रस्त्यातच भेटला. त्याला मागील वर्षी आपल्या मालवाहू गाडीचा चालक म्हणून त्यांनी कामावर ठेवले होते. मात्र पगाराचे पैसे वाढवून मागितल्याने त्याला १५ फेब्रुवारी २०२४ ला कामावरून कमी करण्यात आले होते. तुम्ही कामावरून का काढले? असे म्हणून भूषण शिंदे याने अश्लील शिवीगाळ केली. सोबत वाद घालून त्याने मुंदोकार यांच्या नाकावर लाथ हाणली. त्यावेळी परिसरात उभा असलेला लक्ष्मण शिंदे आणि राजाराम शिंदे यांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर नंदकिशोर मुंदोकार यांनी धामणगाव बढे पोलीस स्टेशन गाठून भूषण शिंदे याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.