... अन् संतप्त गावकऱ्यांनी 'त्या" घटनेमुळे थेट वीज अभियंत्याला,वरिष्ठ तंत्रज्ञाना झोडपले..!खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल..!

 
police station kahamgaon

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे  गावकऱ्यांनी वीज अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञांना झोडपल्याचा प्रकार समोर आलाय. ट्रॅक्टरने रोटावेटर करतांना लोंबळकळलेल्या तारा गळ्यात गुंतल्याने ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. घटनेचा पंचनामा करायला गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी चांगलेच झोडपले.

खामगाव तालुक्यातील (पिंप्राळा शिवारात) १६ जूनच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान  श्रीधर दयाराम पटोकार (वय वर्ष-४१) हे  नारायण किसन गावंडे यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करीत होते. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत खांबावरील लोंबकळलेल्या विद्युत तारांचा स्पर्श ट्रॅक्टरला झाल्याने पटोकार यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही माहिती विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक अभियंता कुणाल बाबुराव ठाकरे ( वय वर्ष - ३९), वरिष्ठ तंत्रज्ञ संजय जाधव, ज्ञानेश्वर बावस्कर यांना १६ जून २३ रोजी सकाळी घटनास्थळावर पाठविले होते. घटनास्थळाची पाहणी करीत असतांना पिंप्राळा येथील कैलास पाचपोर याने कुणाल ठाकरे यांच्या अंगावर येवून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तर गोविंदा दत्तात्रय शेजोळे याने डोक्यात दगड मारून जखमी केले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ संजय जाधव यांना सुध्दा दौलत दयाराम पेसोडे ,संतोष यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. वरिष्ठ तंत्रज्ञ संजय बावस्कार यांना सुध्दा शिवीगाळ करून लोटपाट केली. याप्रकरणी कुणाल ठाकरे यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय रविंद्र लांडे करीत आहे.