चक्क नव्या एसपी ऑफिस वर डल्ला मारण्याचा प्रयत्न.!

 
प्सब
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरट्यांनी चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरातून लोखंडी गेट चोरून नेल्याची घटना आज १ मार्चच्या सकाळी घडली. सायकल रिक्षातून गेट नेत असताना एका पोलिसाने पाहताच रिक्षाचालकाला थांबविण्यात आले ,त्यांनतर गेट चोरून नेल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा
                       जाहिरात 👆
सायकल रिक्षाचालक अकबर शाह गुलाब शाह(रा.मिर्झा नगर) यांच्याकडून लोखंडी गेट जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी ७ वाजेच्या सुमारास अकबर शाह याने शाम गोर आणि अनुराग हिवळे याच्यासह
(रा.सावित्रीबाई फुले नगर) पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरातून जुने लोखंडी गेट चोरी केले होते. गेट सायकल रिक्षावर टाकून नेत असताना चिखली रोडवरील लहानी देवी परिसरात हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या निदर्शनात आले. त्यांनतर त्यांनी तिघांना थांबविले असता. शाम आणि अनुराग हिवाळे याने तेथून पळ काढला. अकबर शाह गुलाब शाह याला ताब्यात घेवून शहर ठाण्यात आणण्यात आले. हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ.सुभाष मस्के करत आहेत.