५० वर्षीय व्यक्‍तीचे संतापजनक कृत्‍य!; ९ वर्षांच्या बालिकेला म्‍हणे...

 
child rape

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५० वर्षीय व्यक्‍तीचे ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग केला. ही घटना काल, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास नारखेड (ता. नांदुरा) येथे घडली. पीडित बालिकेच्या वडिलांनी काल रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच मधुकर प्रल्हाद घोराडे (५०) याच्याविरुद्ध पोस्को व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते व त्यांची पत्नी काल दुपारी शेतात गेले होते. त्यांची ९ वर्षांची मुलगी दुपारी घरी एकटीच होती. ती अंघोळ करत असताना मधुकर हा न्हाणीघरात शिरला व त्याचे गुप्तांग मुलीला दाखवून कपडे काढायला सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या बालिकेने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील आजी-आजोबा धावत तिकडे गेल्याने त्‍याने घटनास्थळावरून पळ काढला. पीडित बालिकेचे आई- वडील शेतातून आल्यानंतर तिने हा प्रकार आई- वडिलांना सांगितला. रात्री उशिरा पीडितेच्या वडिलांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात पोस्कोसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी तपास करत आहेत.