अंबाशीच्या सुहासच्या लग्नात विघ्न! अपघातात आत्याच्या नवऱ्याचा, चुलत्याचा मृत्यू! उद्या लग्नाचा मुहूर्त,आज विपरीत घडल! लग्नघरी शोककळा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सगळीकडे आनंदी आनंद होता. अंबाशी येथील सुभाषराव दामोधरराव देशमुख यांचा लहान मुलगा सुहास याचे उद्या १८ एप्रिलला जालना येथील गोल्डी लॉन येथे लग्न ठरलेले.आज १७ एप्रिलला अंबाशी येथून देशमुख कुटुंबातील वऱ्हाडी जालन्यासाठी रवाना झालेले..काही गाड्या जालन्यात पोहचल्या होत्या..काही गाड्या रस्त्याने होत्या.. सगळ्या वऱ्हाडी मंडळात लग्नाचा उत्साह होता, आनंद होता..पण या उत्साहावर क्षणार्धात विरजण पडलं.. देऊळगावराजा जवळील दगडवाडी जवळ वऱ्हाडाच्या एका स्कॉर्पिओ वाहनाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला..या अपघातात अंबाशी येथील तिघांचा तर सवना येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेले सर्वच नवरदेव सुहासचे अतिशय जवळचे आहे. आत्याच्या नवरा (मामा) आणि चुलत्याला या अपघातात प्राण गमवावे लागले.
Advt
 Advt. 👆
ठार झालेल्यांमध्ये अशोक भीमराव नायक(६५, रा. सवना) हे नवरदेव सुहासच्या आत्याच्या पती(मामा) आहेत तर विलास जयवंत देशमुख (६३) हे सुहासचे काका आहेत . चालक योगेश देशमुख आणि वसंत देशमुख हेदेखील जवळचे आहेत. इतर चौघावांवर देऊळगावराजाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे अंबाशी आणि नवरीचे गाव असलेल्या जालना जिल्ह्यातील गोळेगाव या गावावर शोककळा पसरली आहे.