बातमी वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल! लाज सोडली! शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी घटना; तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यावर वर्गशिक्षकाचा अनैसर्गिक अत्याचार! पुस्तक वाचण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्.....

 
fghj
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात घडली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील  धानोरा गावात जिल्हा परिषद शिक्षकाने विकृतीचा कळस गाठलाय. तिसऱ्या वर्गातील मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जावेदुद्दीन नसीमोद्दीन पटेल असे विकृत शिक्षकाचे नाव आहे.
 

प्राप्त माहितीनुसार विकृत शिक्षक जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळेतील आहे. घटना ७ जुलैच्या दुपारची आहे. पिडीत मुलगा तिसऱ्या वर्गात शिकतो. पिडीत मुलाच्या आईने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात याप्रकणाची तक्रार दिली आहे.
   
तक्रारीनुसार पीडित मुलगा काल रडत रडत घरी आला. आई वडिलांनी विचारल्यावर त्याने त्याच्यासोबत शाळेत घडलेला प्रकार कथन केला. त्याचा शिक्षक असलेल्या जावेदुद्दिन ने त्याला पुस्तकातील धडा शिकवण्याचा बहाण्याने वेगळ्या खोलीत बोलावले. चिमुकल्याची हाफपँट जावेदुद्दिनने काढली आणि त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. घडलेली घटना कुणाला सांगायची नाही, नाहीतर जीवाने मारेन अशी धमकीही त्याने चिमुकल्या विद्यार्थ्याला दिली. 

दरम्यान या घटनेनंतर संतप्त पालकांनी जावेदुद्दिन च्या घरी जाऊन त्याला चांगलाच चोप दिल्याचे समजते. विकृत जावेदुद्दिन वर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.