फेसबुकवर ओळख झाल्यावर ... पक्षात मोठे पद देण्याचे आमिष देऊन केला बलात्कार!
'ते' फोटो' व्हायरल करण्याची धमकी देत करीत राहिला अत्याचार!आता गेला 'आत'... शेगावची घटना
Feb 18, 2024, 20:42 IST
बुलढाणा(बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा): ती अमरावती ची अन हा शेगाव चा... फेसबुकवर ओळख झाली आणि राजकीय पक्षाचे मोठे पद देण्याचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले... प्रेमाच्या आणाभाका दाखवुन त्याने अगोदर गुंगीत तिच्यावर बलात्कार केला... एवढ्यावरच न थांबता त्याने धमक्या देत नंतरही वारंवार तिच्या अब्रूचे लचके तोडले... अति झाल्यावर तिने पोलिसात धाव घेतली आणि हा नराधम आत गेला...
बाईने लक्ष्मणरेषा ओलांडली की काय होते याचे अन राजकारणाचा हव्यास कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय आणणाऱ्या या घटनेसंदर्भात शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस एका दिवंगत राजकारण्याच्या पुत्राने राजकीय पक्षाचे मोठे पद देण्याचे आमिष दाखविले. याच्या 'आशिष'मुळे आपण नेत्या होऊ, राजकारण गाजवू अशी राजकीय स्वप्ने ती २ मुलांची आई असलेली महिला पाहू लागली. प्रेमाचे नाटक रंगवून त्याने तिला जाळ्यात ओढले दाखवून त्याने गुंगीत 'तिची' अब्रू लुटली! एवढेच नव्हे नको त्या अवस्थेतील शेगाव येथील आपत्तीजनक फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्या शरीराचे लचके तोडत राहीला. अखेर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली आणि तो नराधम आता गजाआड गेला...
फिर्यादी ही विवाहीत असुन तीला दोन अपत्ये आहे.फेसबुकच्या माध्यामातून आरोपी याच्यासोबत ओळख झाली आरोपी हा मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे ,मी पक्षात मोठे पद मिळवून देतो असे आमिष पीडित महिलेस देत होता.
पीडित महिलेची जवळीक साधुन प्रेम व्यक्त करायचा नंतर आरोपी याने माझी आइ आजारी आहे असे खोटे सांगुन त्याचे राहते घरी घेवुन गेला. कोल्ड्रिंक पिण्यास देवुन पीडित महिलेस गुंगी आल्यानंतर बळजबरीने अत्याचार केल्यावर तिचे फोटो काढले. त्यानंतर पीडित महिलेने आरोपीस पदासाठी विचारणा केली असता 'तसे' फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला व ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
महिलेच्या लेखी रिपोर्ट वरून शहर पोलीसांनी आरोपी आशिष सत्यानारायण व्यास (वय ३७ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद चौक शेगाव )याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये कलम ३७६ (२),(n), ३२८, ५०४, ५०६ या कलमांचा समावेश आहे. तपास ठाणेदार ठाकरे यांचे आदेशाने सपोनि आयरे हे करीत आहेत.