अखेर वैतागला तरुण! विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन! अंढेऱ्याची घटना..!
Mar 21, 2023, 09:07 IST

देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव आणि त्यात वाढत चाललेला कर्जाचा बोजा याला वैतागून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे ही घटना घडली.
शंकर देविदास ढाकणे (२७) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर ढाकणे अल्पभूधारक शेतकरी होते.१९ मार्चला त्यांनी विष प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी आधी देऊळगावमही व नंतर जालना येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.