दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या आणखी तिघांवर खामगाव तालुक्‍यात कारवाई!; पिंपळगाव राजा पोलिसांची कामगिरी

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थर्टिफर्स्टला दारूला पिऊन दुचाकीवरून धूमस्टाइल भरधाव जाणाऱ्या तिघांना पिंपळगाव राजा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. खामगाव तालुक्‍यातील निपाणा बसस्‍थानक, तांदुळवाडी फाटा आणि  पिंपळगाव राजा ग्रामपंचायत चौकात पोलिसांनी आज, ३१ डिसेंबरला सायंकाळी या कारवाया केल्या.

शतरसिंग ऊर्फ शत्रू श्रीराम जमरे (२५, रा. भिंगारा ता. जळगाव जामोद ह मु. निपाणा) हा निपाना बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत मोटारसायकल भरधाव चालवताना पोलिसांनी पकडला. त्‍याच्‍याविरुद्ध एएसआय संजय कांडेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नापोकाँ शेख जावेद करत आहेत.

तांदुळवाडी फाट्यावर दीपक गजाननराव गावंडे (२७, रा. शेगाव) याला दारूच्या नशेत मोटारसायकलवर भरधाव जाताना पकडण्यात आले. त्‍याच्‍याविरुद्ध पोहेकाँ रामेश्वर बोरसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळगाव राजा ग्रामपंचायत चौकात मुकुंदा जगन्नाथ तेलंग (४०, रा. बेलुरा) याला पकडण्यात आले. त्‍याच्‍याविरुद्ध नापोकाँ संतोष डागोर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय प्रवीणसिंह चौहान करत आहेत.