मोटारसायकलीवरील नियंत्रण सुटून अपघात; तरुणाचा मृत्‍यू, नांदुरा तालुक्यातील घटना

 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून २५ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर रोडवर आज, १० जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास अलमपूर गावानजीक घडली.

गोपाल किसन मांजरे (रा. अलमपूर) असे मृतक तरुणाचे नाव आहे. गोपाल मांजरे नांदुऱ्याकडून अलमपूरकडे मोटारसायकलीने (एमएच २८ एएल ४११५) जात होता. मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडकला. यात गंभीर जखमी झाला. ही माहिती ओमसाई फाऊंडेशन अध्यक्ष विलास निबोळकर यांना मिळताच रुग्णवाहिका चालक कृष्णा नालटासह रुग्णवाहिका घेऊन ते घटनास्थळी आले. गंभीर जखमी तरुणाला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमी तरुणावर वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन बेंडे यांनी उपचार केले. मात्र त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.