विजेच्या खांबावर काम करीत होता तरुण; अचानक शॉक लागला जीव अन् गेला...! संग्रामपूरातील घटना

 

संग्रामपूर, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  संग्रामपूर तालुक्यातील कोद्री शिवारातील दांदळे यांचे शेतात शॉक लागून  ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. मृतकाचे नाव योगेश महादेवराव खोंड आहे

कोद्री शिवारात  विजेच्या खांबावर काम करताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन शॉक लागल्याने योगेश खोंड खांबावरुन खाली फेकल्या गेला. दरम्यान, काही ग्रामस्थ व नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषीत केले. याबाबत दिलेल्या फिर्यादी वरुन तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पातुर्डा चौकीचे बीट जमादार नंदकिशोर तिवारी करीत आहेत. मृतकाच्या पश्चात पत्नी, आई, वडिल असा परिवार आहे.