दुष्काळाचा बळी! पाऊस पडत नाही म्हणून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली! शेगाव तालुक्यातील घटना...

 
man
शेगाव(संतोष देठे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातच काय संपूर्ण राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. गेल्या पंधरवड्यापाऊस पावसाने दांडी मारलेली असल्याने पिके करपायला लागली आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. या भीतीपोटी पाऊस येत नसल्याने शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली. यशवंत वासुदेव फुलकर (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
 

 यशवंत फुलकर यांच्याकडे दोन एकर शेती आहे.त्यात त्यांनी कपाशी लागवड व सोयाबीन पेरणी केली होती. मात्र पाऊस नसल्याने त्यांचे पीक करपत  आहे. त्यांच्यावर शेगावच्या सेंट्रल बँकेचे व शेगावच्या लोकमान्य पतसंस्थेचे साडेतीन लाख रुपये कर्ज होते. पाऊस पडला नाही तर उत्पादन होणार नाही मग कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. या विंवंचनेतच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे.