BREAKING चिखलीत गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडला! फायनान्स वाल्यांनी हप्त्यासाठी ट्रक अडवला अन् बिंग फुटले..

 
Nsnns
चिखली(ओम सोळंकी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात गोवंशाची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. चिखली ते मेहकर फाटा दरम्यान असलेल्या शुभम सेल्स समोर आज,३ जूनच्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ट्रक मध्ये १५ गोवंशीय गुरे (बैल) होते. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार सार्थक असोशिएट या फायनान्स कंपनीने सदर ट्रकच्या खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले होते. ट्रक मालक हप्ता भरत नसल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा ट्रक चिखली ते मेहकर फाटा दरम्यान असलेल्या शुभम सेल्स दुकानासमोर अडवला. यावेळी आयशर ट्रक मध्ये गोवांशीय गुरे असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले, यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी जमली. त्याआधीच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनास्थळी चिखली पोलिसांनी धाव घेतली. ट्रक सध्या चिखली पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून त्यातून १५ गुरांची सुटका करण्यात आली आहे. सदर गुरांना गोशाळेत पाठवण्यात येणार आहे.