मेहकरच्या पेट्रोल पंपावरून लांबवलेला ट्रक सापडला! बुलडाणा एलसिबी अन् मेहकर पोलिसांनी ६ आरोपींना केली अटक;२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

 
fghh

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या वरद सर्वो पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या ट्रक अज्ञात चोरट्यांनी लांबवला होता. यासंबंधीचे सविस्तर वृत्त कालच बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केले होते. दरम्यान त्या वृत्ताची छाई वळते न वळते तोच एलसिबी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दमदार कारवाई करीत लांबवलेला ट्रक ६ आरोपींच्या ताब्यातून जप्त करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

अटक करण्यात ६ आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. आरोपींच्या ताब्यातून ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही कार असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकबर शहा इसाक शहा (२७), सैय्यद समीर सैय्यद नासीर (३१), सैय्यद सिंकदर अब्दुल मनान (३४), सैय्यद जुनेद सैय्यद अहमद(३१), इरफान खान अयुब खान(२४), सादिक शेख जानी (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांनी याआधी असे अनेक कारनामे केल्याचे समजते..


यांनी केली कारवाई..

   जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगोटे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर काळे, पोना अनंता फरताळे, मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सैय्यद हारूण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक गाढवे, पोहेकॉ सदानंद चापले, पोकॉ करीम शहा यांनी केली..