चोर तर चोर, वरून शिरजोर! दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस गेले; पोलिसांवरच टोळक्याने चढवला हल्ला!हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल..!

 
Jdhdhd
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मऱ्यांवर २० ते २५ जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील फत्तेपुर येथे घडली आहे.
झाले असे की, ३० मे रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथे शेतात घर करून राहणाऱ्या तायडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला होता.या दरोड्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत होते. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी ३१ मे रोजी पहाटे फत्तेपुर (ता.खामगाव) येथे गेले होते. त्या ठिकाणी काही लोकांनी पोलिसांशी वाद घालून पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. त्यातील २० ते २५ लोकांनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला.लाठ्या - काठ्या, दगडांनी मारहाण केली.अश्लील शिवीगाळ करत खोट्या केसेस दाखल करून तुम्हाला अडकवू अशा धमक्याही दिल्या. या मारहाणीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोना युवराज राठोड यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी राजू सोनू भोसले, विजू सोनू भोसले, लहू धंदरे, सविता भोसले, सौ मंदा सोनू भोसले, गीता आनंद पवार, आणखी १५ ते २० जणांविरुद्ध विविध कलमान्वे गुन्हे दाखल केले आहेत.