देऊळगाव राजा शहरातील बायपास वर भीषण अपघात! पिकअप ची ट्रॉली मागच्या मागेच घसरली; पती - पत्नीचा मृत्यू

 
accident
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा शहरातील बायपास वर असलेल्या हॉटेल विरा समोर काल,१७ मार्चच्या रात्री १० वाजता विचित्र अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीला उपचाराला नेत असताना वाटेत मृत्यू झाला. मृतक दाम्पत्य देऊळगावराजा तालुक्यातील जळपिंपळगाव येथील राहणारे आहे.

 प्राप्त माहितीनुसार जळपिंपळगाव येथील भगवान काकड(४४) हे त्यांची पत्नी व मुलासह पिकअप वाहनाने जळपिंपळगाव कडे येत होते. त्यांचा मुलगा हा पिकअप वाहनाच्या केबिन मध्ये चालकाच्या बाजूला बसला होता तर दोघे पती पत्नी हे वाहनाच्या ट्रॉली मध्ये बसलेले होते. रात्री १० च्या सुमारास पिकअप वाहन देऊळगाव राजा शहरातील बायपास वरून जात असताना वाहनाची लोखंडी ट्रॉली मागच्या मागे घसरुन पडली तर केबिन समोर जाऊन उलटले. या विचित्र अपघातात भानुदास काकड यांची पत्नी कासाबाई काकड(४०) या जागीच ठार झाल्या तर भगवान काकड गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान उपचारासाठी जालना येथे नेत असताना भगवान काकड यांचाही मृत्यू झाला. वाहनाचा चालक आणि काकड यांचा मुलगा दोघांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.