BIG BREAKING सिंदखेडराजात बदलापूरची पुनरावृत्ती? जिल्हा परिषद शाळेतील मुलींसोबत शिक्षकाचे असभ्य वर्तन! शिक्षकाचे वय ५६ वर्षांचे....

 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी येथे जिल्हा परिषद शिक्षकाने वर्गातील मुलींसोबत नको ते वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात आज,२३ ऑगस्टला "त्या" शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप लावण्यात आलेल्या शिक्षकाचे वय ५६ वर्षांचे आहे, २ वर्षानंतर ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आज दुपारीच वर्दडी गावात पोहोचले आहेत.