दुकानातच थाटला पेट्रोलपंप! नांदुऱ्याच्या पोलिसांनी निमगावात जाऊन तिघांना दाखवला हिसका...
Feb 1, 2024, 09:11 IST
नांदुरा : ज्यालाग्रही पदार्थ असलेल्या पेट्रोल व डिझेलची खुली विक्री करणाऱ्या तिघां आरोपीकडून ३२४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना निमगाव बसस्थानकावर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी निमगाव बसथानकावर धाड टाकून आरोपी गणेश बाबाराव देशमुख (वय ४८) रा. निमगाव यांच्याकडून चार लिटर पेट्रोल किंमत ४२८ रुपये व प्लॅस्टिक कॅन किंमत दहा रुपये, असा एकूण ४३८ रुपये, आरोपी श्रीकृष्ण काशीराम दळवी (वय ५४) यांच्याकडून १८ लिटर पेट्रोल किंमत १९२६ अधिक प्लॅस्टिक कॅन वीस रुपये एकूण १९४६ रुपये व आरोपी दिनकर रामधन कुवारे (वय ४०) यांच्याकडून ९ लिटर डिझेल किंमत ८३७ रुपये व प्लॅस्टिक कॅन दोन किंमत वीस रुपये असा ८५७ रुपये, असा एकूण ३२४१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डिझेल व पेट्रोल या ज्वालाग्रही पदार्थांमुळे मानवी जीवितास संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कुठलाही बंदोबस्त न करता पेट्रोल व डिझेल जवळ बाळगून विक्री करीत असताना आढळून आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवी २८५ कलमाखाली गुन्हा दाखल केला असून अंमलदार गजानन इंगळे पुढील तपास करीत आहे.