अल्पवयीन मुलगी संडासला गेली, त्याची वाईट नजर तिच्यावर पडली अन् पुढे जे घडल ते संतापजनक! आता भोगावी लागणार पापाची फळे! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

दोन वर्षांपूर्वी त्याच्या गावातील एक अल्पवयीन मुलगी दुपारी अडीचच्या सुमारास गावाबाहेर संडासला गेली होती. मुलगी एकटी असल्याची संधी साधून सिद्धार्थच्या मनात वाईट विचार आला. त्याने मुलीला पकडुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि सिद्धार्थला पकडले. प्रकरण पोलीसांत गेल्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खामगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणी अंती दोष सिद्ध झाल्याने सिद्धार्थ रामा वाकोडे याला ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली ,सोबतच एक हजार रुपये दंड देखील सुनावण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने १० साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले होते.