जिल्ह्यात मोठी दुर्घटना! दरीत कोसळली बस; जळगाव जामोद - बुऱ्हाणपुर मार्गावर सकाळची घटना, २८ प्रवासी जखमी..

 
गफश
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आज २७ एप्रिलच्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या सीमावर्ती भगात मोठी दुर्घटना घडली. जळगाव जामोद - बुऱ्हाणपुर मार्गावरील करोली घाटात खोल दरीत एक खाजगी बस कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. 
  सदर बस इंदोर येथून अकोल्याच्या दिशेने जात होती. या दरम्यानच बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.