सार्वजनिक ठिकाणी एकटा पुरुष करत होता चुकीचे काम ! पोलिसांनी घडविली अद्दल..

 
नांदुरा

नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नांदुरा तालुक्यातील चांदूरबिस्वा येथील गुजरी चौकात सार्वजनिक ठिकाणी चुकीचे काम करणाऱ्या एकट्या पुरुषाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. २९ मेच्या सकाळी १०:३० वाजता छापा मारून 'त्याला' ताब्यात घेतले. 

 याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचायत समक्ष धाड टाकली. सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारून कागदावर वरली मटक्याच्या चिठ्ठ्या लिहून जुगार खेळणाऱ्या एका पुरुषाकडून ३५५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. अनिल भानुदास हेलकर
 (५२ वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नांदुरा तालुक्यातील विविध भागात वरली मटक्यासह अन्य जुगार धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. शहरातील चौकात सर्रासपणे कायद्याची भीती न बाळगता अवैध धंदे सुरू आहेत. अनेक ठिकाणी बरबादीची दुकाने थाटल्या गेल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.