काळीज पिळवटून टाकणारी घटना! त्याने दोन भावांचा जीव वाचवला पण तो स्वतःला वाचवू शकला नाही! कोलाऱ्याच्या जीवनचा शेततळ्यात बुडून मृत्यू

 
dfghj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील कोलारा येथे आज,९ जूनच्या दुपारी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. शेततळ्यात पोहत असताना स्वतःच्या दोन लहान्या भावांना वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा दम लागल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.  आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कोलारा गावावर शोककळा पसरली आहे.
 

जीवन रवींद्र सोळंकी (१९, रा. कोलारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार जीवन त्यांच्या लहान भावासह व काकाच्या मुलासोबत गावातीलच उद्धव पवार यांच्या शेततळ्यात पोहत होते. १० गुठ्यांच्या या शेततळ्यात कापड टाकलेले होते. जीवनच्या दोन्ही भावांना काठावर पोहचायला अडचण जात असल्याचे पाहून त्याने दोन्ही भावडांना काठावर पोहचवण्याचा प्रयत्न केला. काठावरील कापड हाती येत नसल्याने दोन्ही भावडांची अडचण होत होती, हे करीत असताना, दोन्ही भावांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना जिवनला पाण्यात दम लागला, मुलांची आरडाओरड एकूण  रामदास सोळंकी आणि त्यापाठोपाठ कैलास सोळंकी या शेतकऱ्यांनी शेततळ्यात उड्या घेतल्या. जिवनच्या भावडांना वाचवण्यात यश आले मात्र जीवन पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.