दोस्त दोस्त ना रहा! पैशापुढे दोस्ती फिकी पडली; तिघांनी मिळून मित्राचा जीव घेतला; नांदूरा येथील "त्या" खुनाचे धक्कादायक कारण समोर...
Mar 7, 2024, 15:51 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नांदुरा खून प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. तालुक्यातील लोणवडी शिवारात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. या मृतकाची ओळख पटली असून हर्षल उर्फ सदाशिव घोपे (३२ वर्ष) रा. घाटपुरी ता. खामगाव असे मृतकाचे नाव आहे.पैश्याच्या व्यवहाराचा वाद टोकाला जावून हर्षलचा खून करण्यात आल्याचे समजते. जवळचेच तिघे मित्र त्याचे मारेकरी ठरले. पोलिसांनी त्यांना काल ६ मार्चच्या रात्री ताब्यात घेतले आहे.
आकाश उर्फ आदिनाथ रावणकर (रा. घाटपुरी), रुपेश कुरवाडे (रा. शेगाव), मयूर शेलार (रा.वाडी) अशी आरोपी त्यांची नावे असून त्यांनी खुनात वापरलेली टाटा इंडिका कार पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , लोणावडी शिवारातील शेतकरी संदीप तायडे यांना ३ मार्चच्या सकाळी कपाळ, फुटलेले चामडी निघालेली अश्या वर्णनाचा एका मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी नांदुरा पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली. त्यावरून अज्ञातांवर खूणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू होता. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे तिघा मारेकरींना पोलिसांनी काल रात्री उचलले. उधारी पैशाच्या व्यवहार आणि त्यातून झालेला वाद टोकाला गेला. आणि त्यातूनच मित्रांनी २ मार्चच्या रात्री हर्षलचा खून केला. ज्यांनी हर्षलला संपवल ते तिघे त्याचे जवळचे मित्र होते.
यांनी केली कारवाई!
खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एक महत्त्वाचे कामगिरी पथक नेमण्यात आले होते. ही कामगिरी सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव , बी. बी महामुनी- अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि, अशोक एन. लांडे-प्रभारी अधिकारी स्थागुशा. बुलढाणा, पोनि, विलास पाटील पो.स्टे. नांदूरा, सपोनि, आशिष चेचरे, पोउपनि, सचिन कानडे, पोहेकों, दिगंबर कपाटे पंकज मेहेर, पोना, गणेश पाटील, पोकों, विजय सोनोने, दिपक वायाळ, चापोना, सुरेश भिसे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, पोहेकॉ. मिलींद जवंजाळ, पोना, संजय जाधव, राहूल ससाने, शैलेश बहादुरकर पोकॉ. विनायक मानकर, विनोद भोजने, कैलास सुरडकर, रबि झगरे, रवि सावळे पो.स्टे. नांदुरा, पोकॉ, संदिप टाकसाळ पो.स्टे. शिवाजीनगर, पोकों, प्रकाश गव्हांदे पो.स्टे. शेगांव शहर, पोहेकों. राजू आडवे-सायबर पो.स्टे., बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.