खामगावात कुत्र्याला फिरवण्यासाठी वर्दीवर आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याची दाम्पत्यासोबत अरेरावी! दाम्पत्याचे फोटो काढले,म्हणे इकडे कशाला फिरतात, कारवाईच करते!

 
खामगाव( विनोद भोकरे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खाकी वर्दी बघितली की मनात आपसूकच आदराची भावना निर्माण होते. मात्र काही लोक या वर्दीचा गैफायदा घेऊन अरेरावी करण्याचा प्रयत्न करतात. खामगाव अशाच एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अरेरावी  पणा समोर आलाय. खामगावातल्या पंढरी नगरी भागातील गर्भवती महिला जेवण झाल्यानंतर पतीसोबत फिरत असताना परिसरात कुत्र्याला फिरवण्यासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने या दाम्पत्यासोबत अरेरावी केली. इथे का बसले? तुमचे फोटोच काढते, तुमच्यावर कारवाई करीन असे म्हणत दाम्पत्याचा फोटो काढला आणि कारवाईची धमकी दिली. मात्र चौकशी अंती सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी संपलेली असताना  त्या महिला कर्मचाऱ्याकडून उगाचच वर्दीचा धाक दाखवून लोकांना घाबरवण्याचा धक्कादायक  प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

अलिकडे धावपळीच्या जीवनशैलीमुळं कित्येक लोक रात्रीचे जेवण झाले की लगेच झोपायला जातात. असं करणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. तुमचं वजन वाढत असेल तर रात्री चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. निरोगी आहार आणि चालण्यामुळं देखील रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. रात्री जेवल्यानंतर १५ ते ३० मिनिटे चालल्याने पचनशक्ती सुधारते. अन्न सहज पचते त्यामुळे स्थानिक पंढरी नगर भागात राहणारे दांपत्य काल,१०  मार्च रोजी रात्री साडेआठ च्या सुमारास जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी गेले होते. महिला गर्भवती असल्याने फिरून झाल्यानंतर सदर दाम्पत्य रोडच्या बाजूला असलेल्या दगडावर बसले. त्यावेळी  खामगाव शहर पोलिस स्टेशनच्या एक महिला पोलिस कर्मचारी आपली १० मार्च रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेची वायरलेस रूम मधील ड्युटी संपवून घरी आल्या. आणि त्यानंतर  रात्री साडेआठ च्या  सुमारास पाळीव कुत्र्याला दुचाकीवर घेवून वर्दीवर फेरफटका मारायला गेल्या. आजुबाजुला घरे असताना आणि रोडच्या कडेला बसलेल्या पती पत्नीला ड्युटी संपलेल्या त्या वर्दीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने  तुम्ही इथे का बसले? असा सवाल केला.

जेव्हा दाम्पत्याने सांगितले की आम्ही इथेच राहतो.  आम्ही पती पत्नी आहोत. गर्भवती असल्याने रोज जेवण झाल्यानंतर फिरायला येतो. असे सांगितले असताना सुध्दा महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपला पोलिसीबाणा व धौस दाखवत तरी तुम्ही इथे का बसले ?  तुमच्यावर कारवाई करते, मी रोज इकडे गस्तीवर असते तुम्ही कधी फिरताना दिसत नाही. सदर दाम्पत्याने वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ड्युटी संपलेल्या आणि वर्दीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने अरेरावी सुरूच ठेवली ?  त्या इसमाने मॅडम आपण ड्युटीवर आहात का? आपले नाव काय असे विचारले असता? महिला पोलिसाने ' मी काय ड्रेस घालून घरी स्वयंपाक करते का? असा उलट जबाब दिला आणि फोटो काढले. आम्हाला कोणालाही  विचारण्याचे आणि कारवाई करण्याचे अधिकार आहेत.  त्यामुळे दाम्पत्याने सुध्दा महिला पोलिसाचे फोटो काढले असता  दामपत्यांचा मोबाईल जप्त करण्याची धमकी दिली आणि मोबाईल घेवून फोटो डिलीट केले. यावेळी यावेळी सदर दांपत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावतो. आपण अरेरावी करत आहात तर महिला पोलीस कर्मचाऱ्याने  कोणालाही फोन लाव. माझे काही होत नाही. मात्र यावेळी सदर पोलिस महिलेला वाटले आता हे प्रकरण वाढेल त्यामुळे त्यांनी फोटो डिलीट करून निघून गेल्या.

पोलिस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात मात्र इथे तर ड्युटी संपल्यानंतर वर्दीवर येवून मी ड्युटीवर आहे, मी गस्तीवर आहे रोज गस्त घालत असते असे म्हणून लोकांना त्रास देणे कितपत योग्य आहे किंवा पोलिस वर्दीचा दुरुपयोग करत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.. आणि तुम्ही कोणालाही फोन लावा माझे काही होत नाही. आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितले आहे असे म्हणून या कामात वरिष्ठांचे नाव घेणे व त्यांच्या कर्तव्यदक्ष कामाला काळीमा फासण्याचे काम करीत आहे किंवा अश्या कृत्याला वरिष्ठांचा तर छुपा पाठिंबा नाही ना? असा प्रश्न उपस्थित होते आहे..

कारवाई होणार का?

याबाबत शहर पोस्टचे ठाणेदार  यांची प्रतिक्रिया घेवून कारवाई करणार का? असा प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला असता ठाणेदार यांनी चौकशी करून सांगतो असे सांगितले

हा तर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार..

कोण कुठे बसावे किंवा काय करावे यांचे प्रत्येकाला स्वतंत्र असते.. मग सदर दाम्पत्य हे ज्या परिसरात राहतात तेथे बसले असताना  त्यांना बोलणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे होय.