शेगावच्या तरुणाविरुद्ध पुण्यात बलात्‍काराचा गुन्हा दाखल

 
rape
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्‍कार करणाऱ्या शेगावमधील रहिवासी २९ वर्षीय तरुणाविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिर प्रमोद पेंढारकर (रा. शेगाव, जि. बुलडाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २३ वर्षीय तरुणीने पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्यात ९ जानेवारीला त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिली. रुचिरने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला विश्वासात घेऊन तिची इच्छा नसतानाही विरोधात जबरदस्तीने ९ ऑक्‍टोबर २०२१ रोजी भोसरी येथे शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करत राहिला.