पिंपरखेडच्या रविकांत विरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा! चुकीचे काम करतांना गवसला...

 
Ps
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील पिंपरखेड गावात विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. दरम्यान अमडापुर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. विक्रेता रविकांत शिवराम जुमडे (५२वर्ष) रा. पिंपरखेड असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार काल २५ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ks
प्राप्त माहितीनुसार, अमडापूर हद्दीतील पिंपरखेड गावात अवैध प्रकारे दारूची हातभट्टी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती अमडापुर पोलीसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी ही बाब ठाणेदारांला कळवली. आदेश मिळताच पुढील कारवाई करीता पोलीसकर्मचारी घटनास्थळी निघाले. गावात आल्यावर पोलिसांनी आपली वाहने बसस्थानक परिसरात लावली. पुढे गेल्यानंतर ग्रामस्थ रामेश्वर जुमडे यांच्या घराजवळ रविकांत जुमडे हाती कॅन घेऊन उभा होता.त्यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता हातभट्टी दिसून आली.रविकांत जुमडेची झडती घेतल्यानंतर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अमडापुर पोलीस ठाण्यात रविकांत जुमडे यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ इ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व जागेवरच कोर्टात हजर राहण्याचे सूचनापत्र देत त्याला सोडण्यात आले असल्याची माहिती आहे.