मालवाहू वाहन , 'कार' ची धडक! एकाचा मृत्यू, दोघे गंभीर तर एक किरकोळ जखमी; लव्हाळा मेहकर मार्गावरील अपघात

 
Accident
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):येथील पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊस समोर आयशर कारच्या धडकेत बुलडाणा येथील एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना दि ९ मार्च चे पहाटे पावनेतीन वाजता घडली.
   प्राप्त माहितीनुसार असे समजते की की, स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ - बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने अवंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलडाणा येथे निघालेल्या होन्डा एमेझ क्र एम एच 28 २५-बी के १७ ९५ ला जोरदार धडक दिल्याने गाडीतील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे सर्व रा सुंदरखेड बुलडाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत तर अविनाश पंजाब गव्हाने रा सुंदरखेड बुलडाणा हा किरकोळ जखमी आहे.
    अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ कडूबा डोईफोडे, पो कॉ लक्ष्मण ईनामे, पो कॉ. राजेश गीते, पो कॉ मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान पोलीसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.