सुलतानपुरच्या डॉ.आर.एन.लाहोटी कॉलेजमध्ये विद्यार्थीनीसोबत वाईट घडल! प्रा.विनोद कोकाटे ने नको ते केल्याचा आरोप..
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील डॉ.आर.एन.लाहोटी महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाविद्यालयातील प्राध्यापक विनोद कोकाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार विद्यार्थिनी २२ वर्षाची आहे. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रा.विनोद कोकाटे याने मदत केली होती. "माझ्यामुळे तुझा प्रवेश झाला आहे, तू माझे नेहमी ऐकत जा, मला फोन करत जा, नाहीतर तुझ्या घरच्यांना मी फोन करून तुझ्याबद्दल चुकीचे सांगून तुझे कॉलेज बंद करायला लावीन" असे कोकाटे विद्यार्थिनीला अधून मधून म्हणायचा.
८ फेब्रुवारीला सकाळी साडेदहाला विद्यार्थिनी कॉलेज ला पोहचली, त्यानंतर कॉलेजच्या लॅब मध्ये बुक घेण्यासाठी गेली असता तिथे प्रा. विनोद कोकाटे बसलेले होते. कोकाटेने विद्यार्थिनीला जवळ बोलावले"तूने मुझे कॉल क्यू नही किया" असे म्हणत कोकटेने विद्यार्थिनीचा डाव हात जबरदस्तीने पकडुन तिला कोपऱ्यात नेले. यावेळी विद्यार्थिनीने आरडाओरड केली असता ओरडली तर जीवाने मारून टाकीन अशी धमकी कोकाटे याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर प्रा. कोकाटेच्या हाताला जोरात हिसका मारून विद्यार्थिनीने पळ काढला. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनी घरी गेली.कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला. काल, ९ फेब्रुवारीला कॉलेजच्या प्राचार्याकडे देखील याबद्दल तक्रार देण्यात आली, त्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आता या प्रकरणात महाविद्यालय प्रशासन प्राध्यापक कोकाटेला पाठीशी घालते की त्याचे निलंबन करते हे पाहणे महत्वाचे ठरेल..