बुलढाण्याच्या सामान्य रुग्णालयाबाहेर रुग्णाच्या नातेवाईकासोबत घडली वाईट घटना! रात्री जेवण करून आले, अन्...

 
Chhh

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकासोबत वाईट घटना घडली. पार्किंग परिसरातून डिस्कवर कंपनीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना ७ जून, शुक्रवार रोजी उघडकीस आली आहे. 

 प्राप्त माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील भारज येथील रहिवासी गजानन भिका हूसके हे बहिणीच्या उपचारासाठी १ जून पासून बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात आले आहेत. उपचारासाठी हूसके यांच्या बहिणीला भरती करण्यात आले आहे.
देखरेख आणि बहिणीच्या काळजीसाठी ते देखील दवाखान्यामध्ये उपस्थित आहेत.
दरम्यान, ३ जूनच्या रात्री बस स्थानक परिसरा मागील भोजनालयात जेवण करून आल्यानंतर हूसके यांनी दररोज प्रमाणे त्यांची डिस्कवर कंपनीची दुचाकी रुग्णालय परिसरात लावली. त्यानंतर ते बहिणीला भेटण्यासाठी वार्डात गेले. काही वेळानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पार्किंग मध्ये लावलेली दुचाकी त्यांना दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी इतरत्र खूप शोधली. खूप शोधून देखील आढळली नसल्याने गजानन हूसके यांनी आपली एमएच २१. एए ९२२० क्रमांकाची डिस्कवर हंड्रेड कंपनीची दुचाकी रुग्णालय परिसरातून चोरीला गेली अशी तक्रार ७ जून रोजी शहर पोलिसांत दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.