कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेला वीसवर्षीय युवक बेपत्ता!

 
बेपत्ता
मासरुळ(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील २० वर्षीय अचानक बेपत्ता झाल्याची घटना १७ मे रोजी उघडकीस आली.
स्थानिकचा रहिवासी असलेला हरी पवार हा युवक महिनोमहिने कामधंद्यासाठी बाहेरगावी असायचा. अधूनमधून गावी परतल्यानंतर घरच्या शेतात कामधंदे करायचा. दरम्यान, गेल्या चार-पाच महिन्यांपासून हरी कामासाठी बाहेरगावी गेला होता.तेव्हापासनू त्याच्यासोबत कोणाचाच संपर्क झाला नाही. परंतु तोंडावर आलेल्या अक्षयतृतीयेच्या सणाला हरी घरी येईल, अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. मात्र, तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी १७ मे रोजी धाड पोलीस स्टेशन गाठून हरी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. हरीचा विवाह अणाला असून त्याला पत्नी, दोन चिमुकल्या मुली आहेत.