मोताळा तालुक्यातील १९ वर्षीय युवती पेपर देण्यासाठी गेली, अजून घरी परतली नाही! कुटुंबियांची सर्वत्र शोधाशोध..

 
मोताळा

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पेपर देण्यासाठी गेलेली १९ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

    धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातील ५२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली, शुक्रवार ३१ मे रोजी १९ वर्षीय युवती पेपर देण्यासाठी घरातून निघून गेली. दुपारी दोन वाजेपर्यंत परत येईल असे तिने आधीच घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर २ वाजून बराच काळ उलटला तरी देखील ती घरी परतली नाही. परिसरात तिचा सर्वत्र शोध सुरू झाला. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. इतरत्र खूप शोधल्यावर देखील युवती मिळून आली नाही. यामुळे धामणगाव बढे पोलिसांत तरुणी हरवल्याची तक्रार दिली आहे.