तुझी उलटी गिनती सुरू; तुझा इतिहास काढला,तुझा गेम होणार! बुलडाण्यात सरकारी अधिकाऱ्याला व्हॉटस्अपवर धमकीचा मॅसेज आल्याने खळबळ
Mon, 26 Sep 2022

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयातील मनिष भागाजी गवळी यांना धमकीचा मॅसेज आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी श्री. गवळी यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरून देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथील दिपक मिसाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मनीष भागाजी गवळी हे बुलडाणा येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयात कार्यरत आहेत. २२ सप्टेंबरला आरोपी दिपक मिसाळ त्यांच्या कार्यालयात आला होता. माझे काम आजच्या आज करून द्या असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. गवळी यांच्या टेबलवरील फाईल फेकून दिली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी गवळी यांच्या व्हाट्सअप वर मॅसेज करून ,तुझी उलटी गिनती सुरू झाली, फोन घे नाहीतर वेळ निघून जाईन, तुझा इतिहास मी काढला. तुझा गेम होणार आहे अशी धमकी दिली.
अशी तक्रार गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी दिपक मिसाळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दत्तात्रय नागरे करीत आहेत.