तरुणांना लागलय भलतचं व्यसन! कंडोमचा वापर भलत्याच कामासाठी; नशा पूर्ण करण्यासाठी कंडोमची घेत आहेत वाफ..! वाचा काय आहे प्रकरण..!

 
vapar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारू, सिगारेट, तंबाखू, गांजा , ड्रग व्यसनांचे हे प्रकार सर्वसामान्य लोकांना माहीत आहेत. अर्थात ज्यांना ह्या व्यसनांबद्दल माहीत आहे ते सगळेच व्यसन करतात असे नाही पण त्याबद्दल वाचनात किंवा ऐकण्यात आले असेलच. मात्र आता तरुणांमध्ये व्यसनाचा एक भलताच ट्रेण्ड सुरू झालाय. कंडोमचा वापर करून तरुण नशा करीत असल्याचा प्रकार समोर आलाय. पश्चिम बंगालमध्ये कंडोमचा अचानक  तुटवडा जाणवू लागल्यानंतर हा प्रकार समोर आलाय.

सुरक्षित लैंगिक संबंधासाठी, लैंगिक आजार टाळण्यासाठी, नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. अर्थात या कामांसाठी कंडोमचा वापर करण्यात गैर काहीही नाही. मात्र दारू , सिगारेट सारखा कंडोमचा वापर व्यसन पूर्ण करण्यासाठी होतोय. पश्चिम बंगाल मध्ये कंडोमचा अचानक तुटवडा जाणवत होता. त्यामुळे कंडोमचा काळाबाजार होऊ लागला. अचानक कंडोमची मागणी वाढल्याने पोलीसही चक्रावले. कंडोमचा काळाबाजार प्रकरणी एका व्यापाऱ्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
  
फ्लेवर्ड कंडोमचा वापर..!
 कंडोम पाण्यात टाकून गरम करून त्या पाण्याची वाफ तरुण घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मीडिया रिपोर्टनुसार कंडोम तयार करतांना त्यात काही सुंगधी तत्वांचा समावेश केल्या जातो. कंडोम गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेतल्याने त्याची नशा येत असल्याचा नशाखोर तरुणांचा दावा आहे. काही तरुण तर कंडोम गरम पाण्यात उकळवून ते पाणी पिऊन नशा करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान हा ट्रेंड आता हळूहळू सगळीकडे पसरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.